Posts

Showing posts from June, 2021
ब्रेक के बाद.....भेट नवी उत्साह नवा.   खूप दिवस झाले नवीन काही लिहिले नव्हते...वाटलं घ्यावा छोटासा ब्रेक...काय करू हल्ली जमाना "ब्रेक के बाद" चाच आहे ना😂😂..दुसरे असे की तुम्हीही कंटाळला असाल ना मी लिहिलेले वाचून?😂😂..मग म्हटलं घ्यावा एक छोटासा ब्रेक. "ब्रेक...अल्पविराम" म्हणा हवे तर...पण कधी कधी खूप गरजेचा होवून जातो...एकसुरी बनू पाहणाऱ्या आयुष्याला देखील याची नितांत गरज असते....आणि मग तो हवा हवासा ब्रेक मिळाला की तिथून पुढचे आयुष्य 'लय'बध्द होते... नि यदा कदाचित येवू घातलेला 'प्रलय' देखील थोपविला जावू शकतो..टाळला जावू शकतो... अगदी कालचीच गोष्ट आहे.मी माझ्या जवळच्या नातेवाईक यांच्या कडे गेलो होतो..तसे गेलो होतो "सांत्वना" साठी...कारण गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषाने ध्यानी मनी नसताना आत्महत्या करून या अमूल्य आयुष्याचा चटका लावणारा शेवट केला होता..एक अशी सुशिक्षित व्यक्ती जी असा टोकाचा निर्णय घेवूच शकणार नाही.... असे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही बातमी ऐकल्यावर वाटत होते... काल त्यांच...