Posts

ब्रेक के बाद.....भेट नवी उत्साह नवा.   खूप दिवस झाले नवीन काही लिहिले नव्हते...वाटलं घ्यावा छोटासा ब्रेक...काय करू हल्ली जमाना "ब्रेक के बाद" चाच आहे ना😂😂..दुसरे असे की तुम्हीही कंटाळला असाल ना मी लिहिलेले वाचून?😂😂..मग म्हटलं घ्यावा एक छोटासा ब्रेक. "ब्रेक...अल्पविराम" म्हणा हवे तर...पण कधी कधी खूप गरजेचा होवून जातो...एकसुरी बनू पाहणाऱ्या आयुष्याला देखील याची नितांत गरज असते....आणि मग तो हवा हवासा ब्रेक मिळाला की तिथून पुढचे आयुष्य 'लय'बध्द होते... नि यदा कदाचित येवू घातलेला 'प्रलय' देखील थोपविला जावू शकतो..टाळला जावू शकतो... अगदी कालचीच गोष्ट आहे.मी माझ्या जवळच्या नातेवाईक यांच्या कडे गेलो होतो..तसे गेलो होतो "सांत्वना" साठी...कारण गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषाने ध्यानी मनी नसताना आत्महत्या करून या अमूल्य आयुष्याचा चटका लावणारा शेवट केला होता..एक अशी सुशिक्षित व्यक्ती जी असा टोकाचा निर्णय घेवूच शकणार नाही.... असे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ही बातमी ऐकल्यावर वाटत होते... काल त्यांच
  फिरूनी नवी जन्मेन मी….! समोरचं फाटक उघडलं, आणि आमची गाडी बापटांच्या बंगल्यात शिरली. प्रशस्त दिमाखदार वास्तू , जणू हसून स्वागत करत होती. खूप मोठी जागा, अन् तेवढाच मोठा बगीचा...! एप्रिल महिना असल्यानं, मोगऱ्याचा वास सर्वत्र दरवळला होता. रंगीबेरंगी फुलांची छोट्या झुडपांवरची नैसर्गिक सजावट लक्ष वेधून घेत होती. मन अगदी प्रसन्न झालं. पोर्चमध्ये गाडी थांबली, आणि आम्ही तिघं उतरलो. श्रीराम बापट, हे एक प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिक, आणि माझे पती नचिकेत साने हे यशस्वी उद्योजक..! काही महिन्यांपूर्वी पाटणकर डॉक्टरांच्या मुलाच्या लग्नात या दोघांची ओळख झाली होती. गप्पांच्या नादात डॉक्टरांनी, मागच्या आठवड्यात, बापटांच्या जुईचं स्थळ, आमच्या अभिजीतसाठी सुचवलं, आणि मी मात्र थोडी गडबडून गेले. माझ्या एकुलत्या एक मुलाचं लग्न...! मी याविषयी विचारच केला नव्हता अजून... पण देवाच्या मनात असेल तर, एखादी गोष्ट घडायला कधीकधी विलंब लागतच नाही, आणि तसंच झालं. पत्रिका जुळते हे लक्षात आल्यावर, दोन-तीन दिवसातच बापटांनी आम्हाला चहापानाला बोलावलं. मुलगी पाहण्याचा अनौपचारिक कार्यक्रम असा ठरला... दारामध्ये दोन्ही बाजूला ठि
  आवडतं मला तुझं डोळ्यातून बोलणं, बोलताना एकटक माझ्याकडे पाहणं.. आवडतं मला तुझं ते गालात हसणं, हसतांना खळीचं अचानक दिसणं… आवडतं मला तुझं ते वायफळ बोलणं, टाळीकरता स्वतःच हाथ पुढे करणं.. आवडतं मला तुझं ते खोटं रागवणं, रागवल्याची सारखी जाणीव करून देणं… आवडतं मला तुझं ते अलड वागणं, प्रसंगी मात्र चेहऱ्यावर शहाणपण आणणं.. आवडतं मला सतत तुझ्यात गुंतणं, गुंतताच स्वतःला हरवून बसणं… आवडतेस तू आणि सारं तुझ्याशी जुळलेलं, जे मात्र तुझ्या मनाला कधीच न कळलेलं…
                      आठवणी आठवणीं च गाठोडं आता पेलेनास झालय. हृदयाच्या कुठल्यातरी कप्प्यातून धूसर  अंधुक जुन्या आठवणी अगदी अलगत तरंगत वर येतात खरंच जागून गेलोय आपण हे सगळं मन मात्र मानायला तयार नाहिये कारण आठवणीच गाठोडं आता पेलेनासा झालय म्हटलं जरा जागा रीती करूया नव्या आठवणीला जागा देऊया... कसलं काय चिवट नुसत्या आठवणी जागच्या हलतच नाहीत जणू नव्या आठवानिंशी वैर आहे त्यांचा... का माझ्यावर मक्तेदारी गजवायचीय जुन्या आठवणींना.... म्हटलं एकदा सर्व झुगारून द्यावं जुन्याची जागा नव्याला द्यावी.... पण मन मात्र निश्चल आहे मनाला कुणाचीही बाजू अशी घायची नाहिये... पण झुकत मापं मात्र आहे जुन्या आठवणीकडे... आताश्या जनवायला लागलंय नवीन काही झेपणार नाही आणि जुनं पेलणार नाही... कारण आठवणीच गाठोडं आता पेलेनास झालय.
  मुलं देखील घर सोडून जातात मुलं देखील घर सोडून जातात जगाच्या बाजारात हरवून जातात जिवापाड जपलेला डेस्कटॉप संगणकसोडून कपाटावर गिटार धूळ खात टाकून व्यायामाची डंबेल्स आणि इतर साधनं मेजावर बेदरकारपणे नोट्स, पेन्स, पेन्सिली टाकून मुलं देखील घर सोडून जातात जगाच्या बाजारात हरवून जातात मला हा रंग / फॅशन पसंत नाही म्हणून नवा कोरा शर्ट कपाटात तस्साच ठेवून पदवीदान समारंभासाठी शिवलेला ब्लेझर जुने मोजे, बनियन्स, रुमाल (या वस्तू का संभाळून ठेवतात?” आम्ही बावळटपणे जपल्यात, त्यांना काही घेणं देणं नाही मुलं देखील घर सोडून जातात जगाच्या बाजारात हरवून जातात झोपताना जी उशी हटकून लागायची तिच्याशिवाय आता कुठं शांत झोप येत असेल त्यांना ताटात अन्न दिसलं की नखरे करणारे आता मिळेल ते खात असतील आपली खोली, आपल्या वस्तूबद्दल स्वामित्वाची भावना जपणारे आता नाईलाजाने सगळं शेअर करीत असतील करियरच्या नादात मुलं देखील घर सोडून जातात जगाच्या बाजारात हरवून जातात आई-बापाला ‘सगळं ठीक चाललंय’ म्हणून थापा मारतात – खोटे दिलासे देतात लहानपणी हजार हट्ट करणारे आता सगळ्याला नको नको म्हणतात कमावता मुलगा होण्याच्या नादात मुलं देखील घर
बिछ्यान्या वरच्या चादरी आता, विस्कटलेल्या नसतात अस्ताव्यस्त फेकलेले आता, कपडे कुठे नसतात. TV च्या रिमोट साठी भांडण होत नाही खाण्यासाठी आता कुणाची फर्माईश होत नाही कारण- आता मुलं मोठी झाली आहेत आणि आम्ही एकटे झाले आहोत. वर्तमानपत्रसाठी रोज सकाळीची मारामारी नसते घर मात्र खुप मोठ अन निटनेटके दिसते. प्रत्येक खोली आता कशी अनोळखी वाटते. रिकामी शांतता अन वेळ,दोन्ही आता खायला उठतात लहानपणीच्या आठवणी फक्त,फोटोमध्ये दिसतात. कारण- मुलं मोठी झाली आहेत अन आम्ही एकटे झालो आहोत. येउन कोणी आता कधी , गळ्यात नाही पडत नाही कोणी कश्यासाठी ,हट्ट आता करत. घास भरवितना आता चिमणी नाही उडत घास भरविल्याच्ं सुद्धा,समाधान नाही मिळत रोजच्या चर्चा अन वादविवादाला, मिळाला पूर्णविराम भांडण मिटविल्याचे देखील, आता नाही समाधान. येता जाता कोणी आता "पप्पी" घेत नाही. पैशाची आता कधी,चणचण भासत नाही. कारण- मुलं मोठी झाली आहेत अन आम्ही एकटे झालो आहोत. आयुष्याचा सुवर्णकाळ संपला,पापण्या लवता लवता सुंदरशी अनुभूती संपली,कळत न कळता. बोबड्या बोबड्या बोलामध्ये,उत्साहाच उधाण होतं होतं क्षणात रडणं तर दुसर्या क्षणी हसणं होत