आवडतं मला तुझं डोळ्यातून बोलणं,

बोलताना एकटक माझ्याकडे पाहणं..
आवडतं मला तुझं ते गालात हसणं,
हसतांना खळीचं अचानक दिसणं…
आवडतं मला तुझं ते वायफळ बोलणं,
टाळीकरता स्वतःच हाथ पुढे करणं..
आवडतं मला तुझं ते खोटं रागवणं,
रागवल्याची सारखी जाणीव करून देणं…
आवडतं मला तुझं ते अलड वागणं,
प्रसंगी मात्र चेहऱ्यावर शहाणपण आणणं..
आवडतं मला सतत तुझ्यात गुंतणं,
गुंतताच स्वतःला हरवून बसणं…
आवडतेस तू आणि सारं तुझ्याशी जुळलेलं,
जे मात्र तुझ्या मनाला कधीच न कळलेलं…

Comments

Popular posts from this blog